क्रिकेटचे बदलते रंग
मित्रांनो : सुप्रभात. प्रबोधन मंच पार्ल्याच्या ह्या मराठीतील सत्रामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. बघता बघता COVIDची तिसरी लाट ओसरली आणि सुदैवाने ह्या वेळी फार त्रास किंवा हानी झाली नाही - आणि ह्या दरम्यान प्रबोधन मंचाची वाटचाल पंचविसाव्या कार्यक्रमाकडे होत आहे. आमच्या बऱ्याच श्रोत्यांसारखी आमचीही इच्छा होती कि आपण पुनश्च दीनानाथ नाट्यगृहात भेटावे. पण COVID मुळे नवीनच सुरु झालेल्या बबल च्या संकल्पने मुळे आमचे आजचे वक्ते 'एका कोशात' आहेत आणि सध्या तरी जाहीर कार्यक्रम करू शकत नाहीत.
फार उत्सुकता न वाढवता, मी आमच्या वक्त्यांची ओळख करून देतो. तज्ञ समालोचक, व्यवस्थापन सल्लागार आणि Winning Ways नावाच्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक, IIM अहमदाबाद मधून १९८५ साली उत्तीर्ण, हैदराबाद ला जन्मलेले : हर्षा भोगले. हर्षा - प्रबोधन मंचात आपले स्वागत. वर्तमान शृंखलेतील कामगिरी आणि त्यामुळे बबल मध्ये असतांनाही आज वेळ काढून आमच्या बरोबर आपले विचार मांडायला आल्या बादल मनःपूर्वक धन्यवाद.
आजच्या कार्यक्रमाच्या शीर्षकाचा विचार करतांना सहज डोळ्यासमोर आले ते लाहान पणी बघितलेले पांढरे फ्लॅनेल चे कपडे, लाल चुटुक चेंडूं आणि सध्याचे दिसणारे विविध रंगातले संघ व पांढरे किंवा गुलाबी चेंडू.
here's your link to the YouTube upload:https://youtu.be/C1EyaOHQ__Y